
मायलेकींनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी विलेपार्ले परिसरात घडली. मीरा परांजपे आणि मंजिरी परांजपे अशी त्या दोघींची नावे आहेत. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मीरा या आजारी असायच्या. त्याची रुग्णसेवा करण्याकरता एक महिलाही केअरटेकर म्हणून तेथे काम करत असायची. बुधवारी सकाळी ती केअरटेकर महिला मीरा यांच्या घरी आली. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने तिने याची माहिती मीराच्या नातेवाईकांना कळवली. नातेवाईकांनी याची माहिती मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले. मीरा आणि मंजिरी या दोघीनी ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांना दिसले. त्या दोघीना उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी दोघींना मृत घोषित केले.
































































