महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात पहिल्यांदाच नब्ज’ ईदोत्सव विशेषांक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील 108 वर्षांच्या दिवाळी अंकाच्या साहित्यिक सांस्कृतिक परंपरेचे बोट धरून रमजान ईदनिमित्त महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात पहिल्यांदाच ‘नब्ज’ हा विशेषांक दाखल झाला आहे. मुस्लिम आणि इतर धर्मीयांच्यात सांस्कृतिक आणि साहित्यिक एकात्मतेची भावना रुजवणे हा यामागचा उद्देश आहे. ब्लॅक इंक मीडिया हाऊसतर्फे प्रकाशित होणाऱ्या या विशेषांकाचे संपादन ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार आणि शेखर देशमुख यांनी केले आहे. पटकथाकार जावेद अख्तर, अनिल अवचट, अरुण म्हात्रे, शेखर देशमुख, फ. म. शहाजिंदे, मुफीद मुजावर, संतोष आंधळे, उर्मिला पवार आदी अनुभवी आणि युवा लेखकांनी या अंकात आपले योगदान दिले आहे. कविता आणि मराठी गजल असे दोन स्वतंत्र विभागही अंकात समाविष्ट आहेत. अंकाच्या नोंदणीसाठी संपर्क 9930803328/ 7058940054