नारळी पौर्णिमेला मुंबईत नारळ फुटले

 रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण आज मुंबईत मोठय़ा उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात आले. अनेक ठिकाणी यावेळी नारळ पह्डणे ही स्पर्धा घेण्यात आली. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला.

शिवसेना-युवासेना वरळी विधानसभेच्या वतीने वरळी नाका येथे नारळ पह्डापह्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, विभाग संघटक किशोरी पेडणेकर, विभाग अधिकारी संकेत सावंत, आकर्षिका पाटील, गोपाळ खाडे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी केले होते.

आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागप्रमुख अनंत पाताडे यांनी कांजुरमार्ग पूर्व येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिलीप ब्रह्मदंडे आणि राहुल गवंडे यांचे विशेष सहकार्य लाभले. कमलाकर पवार, विजय ब्रह्मदंडे, सुधीर सावंत, मुरलीधर ब्रीद, प्रशांत गुरव, संतोष मुरकर, दीपक पाटील, रवी ब्रह्मदंडे, राजू बुराण आदी उपस्थित होते.