गोराईत वाहन अपघातात दोघांचा मृत्यू

मोटरसायकल अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज गोराईच्या वैराळ तलावाजवळ घडली. तर तिसरा तरुण हा जखमी झाला आहे. शिवम साहू, रियान चौधरी असे मृतांची नावे आहे. तर दिनेश तेवर हा जखमी झाला आहे.शिवम, रियान आणि दिनेश हे तिघे सहलीसाठी गोराई परिसरात आले. ते तिघे मोटरसायकलवरून ट्रिपल सीट जात होते. शिवम हा मोटरसायकल चालवत होता. तर रियान आणि दिनेश हे दोघे मागे बसले होते. वैराळ तलावाजवळ रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे त्यांची मोटरसायकल घसरली. ती मोटरसायकल विजेच्या खांब्याला धडकली. या अपघातात रायडरसह दोघांचा जागीच मृत्यू झाला.