
म्हाडाच्या मुंबईतील 118 घरे ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, यासाठी https://bookmyhome.mhada.gov.in या म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया उद्या, 17 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
दोन वेळा सोडतीत समावेश करूनही विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या ताडदेव, भायखळा, लोअर परळ, अॅण्टॉप हिल, चारकोप, मालवणी, शिंपोली, पवई, जुहू येथील घरांचा यात समावेश आहे. ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, सदनिका निश्चिती करणे या प्रक्रियेला 4 मार्चला सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. घराच्या विक्री किमतीच्या 10 टक्के रकमेचा भरणा सदनिका निश्चिती केल्यानंतर 48 तासांच्या आत अर्जदाराने करणे आवश्यक आहे.





























































