
पालिकेच्या जी/दक्षिण परिसरातील कमला मिलम करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांवर पालिकेने आज बुलडोझर चालवून ही अनधिकृत बांधकामे पाडली. जी/दक्षिण विभागाच्या वतीने मुंबई अग्निशमन दल, इमारत व कारखाने, आरोग्य, अतिक्रमण निर्मूलन आणि परिरक्षण विभागांच्या सहाय्याने ही संयुक्त कारवाई करण्यात आली. पालिकेच्या जी/दक्षिण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या संयुक्त कारवाईत कमला मिल्स परिसरातील थिओब्रोमा रेस्टॉरंट, मॅकडोनाल्डस्, शिवसागर हॉटेल, नॅनो’ज कॅफे, स्टारबक्स, बिरा टॅप्रुम, फूड बाय देविका या दुकानांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, परवाना अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी बिरा टॅप्रुम आणि फूड बाय देविका या दुकानांवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जप्तीची कारवाई करण्यात आली.