
डोंगरीच्या झकेरिया मस्जिद स्ट्रीटवरील लिबर्टी हाऊसच्या गेटजवळ एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृत तरुणाचा गळा आवळून हत्या केल्याचे समोर आल्याने डोंगरी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. मेहबुब खान (26) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. लिबर्टी हाऊसजवळ तो मृतावस्थेत आढळला होता. त्याला रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून दाखलपूर्व मृत घोषित केले. मेहबुबच्या गळ्याभोवती आवळल्याच्या खुणा दिसून येत असल्याने पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला.