
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून त्यात सुमारे 11 लाख दुबार मतदार आहेत, असा आरोप काँग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी केला आहे. हे दुबार मतदार कुणासाठी यादीत घुसवले गेलेत, असा सवालही त्यांनी केला आहे.
महानगरपालिका निवडणुकीत अवघ्या काही मतांनीही उमेदवार विजयी होतात. अशा परिस्थितीत इतक्या मोठ्या संख्येने दुबार मतदार असणे गंभीर असल्याचे आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे. मुंबई शहरात सुमारे तीन लाख, पूर्व उपनगरात साडेतीन लाख तर पश्चिम उपनगरात सर्वाधिक सुमारे पाच लाख दुबार मतदार आहेत. काही ठिकाणी तर दोन पेक्षा जास्त वेळा मतदारांची नावे यादीमध्ये आहेत, अशी माहिती आमदार गायकवाड यांनी दिली आहे.
निवडणूक आयोग ढिम्म
मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत. लाखो दुबार मतदार आहेत. मृत्यू पावलेल्या मतदारांची नावेही यादीमधून वगळली गेलेली नाहीत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. याकडे विरोधी पक्षांनी सातत्याने लक्ष वेधल्यानंतरही निवडणूक आयोग ढिम्म बसून आहे. मतदार यादीतून नावे हटवण्याचा अधिकार आम्हाला नाही असा दावा आयोगाने केला आहे. मात्र सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना यादीतील दुबार नावे शोधा व दुबार मतदान होणार नाही याची खात्री करा, असे आदेश आयोगाने दिले आहेत.
…अशी आहे दुबार मतदारांची संख्या
- पश्चिम उपनगर – 4 लाख 98 हजार 597
- पूर्व उपनगर – 3 लाख 29 हजार 216
- मुंबई शहर – 2 लाख 73 हजार



























































