मुंबई पालिकेला नगरविकास खात्याकडून 32 कोटी, मिंध्यांचा निवडणुकीवर डोळा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याचा निवडणुकीवर डोळा आहे. नगरविकास विभागाने प्रथम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत प्रवेश करून प्रभाग रचना नियंत्रणाखाली आणली. त्यानंतर आता दुसरीकडे याच खात्याने मुंबई महानगर पालिकेला मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद करून 32 कोटी रुपयांचा आणि दोन नगर परिषदांना 20 कोटी असा एकूण 52 कोटी रुपयांचा निधी एका दिवसात उपलब्ध करून दिला आहे.