
रविवारी बाहेर जाण्याचा प्लान करत असाल तर आधी ही बातमी वाचा. पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेट्रॅक, सिग्नल प्रणाली, ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान पाच तास जम्बो ब्लॉक असणार आहे. ब्लॉक काळात चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक काळात काही उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील तर काही चर्चगेट गाड्या वांद्रे/दादर स्थानकांपर्यंतच चालवण्यात येतील. प्रवाशांनी वरील व्यवस्था लक्षात घेऊन प्रवास करण्याची विनंती करण्यात येत आहे.
 
             
		





































 
     
    




















