
मुंबईतील कांदिवली परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाच वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. पुढील उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी 16 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
कांदिवली पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कांदिवली येथे तिच्या पालकांसोबत राहते. आरोपी पीडितेचा शेजारी आहे.
16 वर्षीय आरोपीने मुलीवर त्यांच्या राहत्या घराजवळ अत्याचार केल्याचे पीडितेच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. मुलीला प्रथम कांदिवली येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर पुढील उपचारासाठी नायर रुग्णालयात हलविण्यात आले. मुलीची प्रकृती स्थिर असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.























































