
हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत असल्याने सकाळच्या सुमारास कामावर निघालेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेकडून याबाबत कोणतीही उद्घोषणा होत नसल्याने नक्की काय बिघाड झाला याबाबत कळू शकलेले नाही. रेल्वेच्या या ढिसाळ कारभारावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
गुरुवारी सकाळी पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर धावणारी लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली. पनवेल वरून 5 वाजून 17 मिनिटांनी सीएसएमटीकडे जाणारी लोकल 5 वाजून 55 मिनिटांनी निघाली. त्यामुळे या मार्गावरून कार्यालयीन कामासाठी मुंबई आणि उपनगरात जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती.
खारघर स्थानकावर 5 वाजून 28 मिनिटांनी पनवेल ते सीएसएमटी लोकलची वाट पाहणारे प्रवासी –

































































