हार्बरवर आज सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद

मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाइनवर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहील. ब्लॉक काळात दोन्ही स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद लोकल धिम्या मार्गावरून धावणार आहेत. तसेच हार्बरवर वाशी ते नेरुळ आणि ठाणेदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत लोकल सेवा बंद राहणार आहे. मेन लाइनवरील ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकात डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.