
मंत्रालयाच्या तळमजल्यावरील बाथरूमचे सीलिंग कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. मंत्रिमंडळ बैठक असल्यामुळे मंगळवारी मंत्रालयात बरीच गर्दी होती. मात्र या घटनेत कुणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. मंत्रालयात सीलिंग कोसळल्याची पंधरवडय़ातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी सातव्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाबाहेर सिलिंग कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे मंत्रालयातील बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.