
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी 17 मे रोजी ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या मुख्य मार्गावर आणि पनवेल व वाशी विभागांदरम्यानच्या हार्बर मार्गावर मेगा ब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाउन फास्ट मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी विभागात विशेष लोकल ट्रेन्स चालवण्यात येतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.34 ते दुपारी 3.03 पर्यंत सुटणाऱ्या डाउन फास्ट/सेमी-फास्ट सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या लाईनवर वळवण्यात येतील. तसेच या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.
कल्याणहून सकाळी 10.28 ते दुपारी 3.40 पर्यंत सुटणाऱ्या अप फास्ट/सेमीफास्ट गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर त्या पुन्हा अप स्लो लाईनवर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादरहून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गिकेवर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे पोहोचणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे दरम्यान सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर लाईन सेवा (पोर्ट लाईन वगळून) सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत सुरू राहतील. पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी अप हार्बर लाईन सेवा सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून बेलापूर/पनवेलकडे जाणारी डाउन हार्बर लाईन सेवा सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंत रद्द करण्यात येतील.
पनवेलहून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स-हार्बर लाईन सेवा सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 पर्यंत आणि ठाण्याहून पनवेलकडे जाणारी डाउन ट्रान्स-हार्बर लाईन सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत रद्द करण्यात येईल. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.

























































