शाळेच्या फी वाढीविरोधात तक्रारीसाठी 25 टक्के पालकांनी एकत्र येण्याची अट शिथिल करा, वरुण सरदेसाई यांची मागणी

शाळेच्या फी वाढीविरोधात तक्रारीसाठी 25 टक्के पालकांनी एकत्र येण्याची अट शिथिल करा, अशी मागणी आज विधानसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केली आहे.

विधानसभेत बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले आहेत की, “सध्या जरा एखाद्या शिळेची फी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवली असेल तर, ती कमी करण्यासाठी किमान 25 टक्के पालकांनी एकत्र येऊन त्याची तक्रार करणं गरजेचं आहे. तरच त्याची दखल घेतली जाते. माझा पहिला प्रश्न आहे की, मुंबईत शालेय शिक्षण घेणं हे मध्यमवर्गीयांसाठी परवडणारे नाही. 25 टक्के पालकांनी एकत्र येन हे खूप कठीण होतं, त्यामुळे शाळेच्या फी वाढीविरोधात तक्रार करण्यासाठी 25 टक्के पालकांनी एकत्र येण्याची अट शिथिल करणार का?”

वरुण सरदेसाई म्हणाले, “शाळेच्या फीवर सरकार म्हणून कॅप ठेवतो. शिळेची फी हे लोक कॅप करतात. मात्र पिकनिक फी, डेव्हलपमेंट कॉस्ट, लॅब कॉस्ट असे विविध शुल्क संस्थेच्या, ट्रस्टच्या नावाने घेतले जात असल्याने पालकांना मोठा भुर्दंड पडतो. केवळ एज्युकेशन फी न पाहता या संपूर्ण फीवर सरकार कॅपिंग करणार का? असा प्रश्न त्यांनी विधानसभेत विचारला आहे.”