
वृत्तपत्रासाठी लागणाऱया कागदाच्या किमती वाढल्या आहेत. कोरोना महामारीमुळे वृत्तपत्र व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर 1 जूनपासून मुंबईतील सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या किमती वाढवण्याचा निर्णय शिवसेना नेते, राज्याचे उद्योगमंत्री व वृत्तपत्र विव्रेता संघाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
सुभाष देसाई यांच्या ‘शिवनेरी’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. त्यात वृत्तपत्र विव्रेता संघटनेचे प्रतिनिधी, वृत्तपत्र व्यवस्थापनाचे प्रमुख अधिकारी, युनायटेड पह्रम ऑफ न्यूजपेपर मुंबईचे अध्यक्ष बाजीराव दांगट आदी या बैठकीला उपस्थित होते. वृत्तपत्र व्यवसायाला भेडसावणाऱया विविध समस्यांवर यावेळी चर्चा झाली.
वृत्तपत्र व्यवसाय टिकावा, त्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी सुभाष देसाई यांचे सदैव सहकार्य लाभते. त्याबद्दल सर्व वृत्तपत्र व्यवस्थापन आणि वृत्तपत्र विव्रेते यांच्या वतीने देसाई यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
रेल्वे-मेट्रो स्थानकांवरील स्टॉल्ससाठी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करणार
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर असणाऱया ‘व्हीलर’ स्टॉल्सवर तसेच मेट्रो रेल्वे स्थानकांवर वृत्तपत्रे मिळत नाहीत अशी वाचकांची तक्रार आहे. रेल्वे आणि मेट्रो स्थानकांवरील स्टॉल्स स्थानिक वृत्तपत्र विव्रेत्यांना चालवण्यासाठी मिळावेत जेणेकरून त्यांना रोजगार मिळू शकेल यासाठी लवकरच पेंद्रीय रेल्वेमंत्री आणि एमएमआरडीसीसोबत चर्चा करू, अशी ग्वाही यावेळी सुभाष देसाई यांनी दिली.

































































