
सामना प्रतिनिधी। मुंबई
अंधेरी परिसरात राहणाऱया पाकिस्तानी जोडप्याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अहमद रहमतुला दौदानी आणि अश्रफ अहमद दौदानी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अहमद हा मूळचा हिंदुस्थानचा रहिवासी. 1986 मध्ये तो पाकिस्तानमध्ये गेला होता. तेथे त्याने पाकिस्तानी महिलेशी लग्न केले. त्यानंतर 1999 साली तो पत्नी आणि दोन मुलींसह हिंदुस्थानात परत आला. हिंदुस्थानात आल्यावर तो मीरा रोड येथे राहत होता. त्यानंतर 2008 पासून तो पत्नी आणि दोन मुलींसह अंधेरी परिसरात राहू लागला. मीरा रोड येथील एका एजंटच्या मदतीने त्याने बनावट कागदपत्रांच्या मदतीने पासपोर्ट तयार केले होते. तसेच आधारकार्ड आणि पॅनकार्डही त्याने काढले होते. अंधेरी परिसरात एक पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाल्यावर विशेष शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली.



























































