मुंबईकरांना कोरोनाची भीतीच वाटत नाही, विनामास्क फिरणाऱयांची संख्या वाढली

मुंबई महापालिकेच्या ‘चेस द व्हायरस’, ‘मिशन झिरो’ तर राज्य सरकारच्या ‘माझे पुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या माध्यमातून मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवले असून रुग्णसंख्या कमी झाली तर संसर्गाचा कालावधी 102 दिवसांवर गेला आहे. असे असताना मुंबईकर मात्र बेफिकीर झाले असून त्यांना कोरोनाची भीतीच उरलेली नाही, असे चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणार्यांची संख्या वाढली असून गेल्या 21 दिवसांत तब्बल 82 हजारांपेक्षा जास्त जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 कोटी 65 लाखांचा दंडही वसूल करण्यात आला. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षितरित्या अॅनलॉक सुरू झाले आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी मुंबईत सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने मास्क वापरणे मुंबई महानगरपालिकेने बंधनकारक केले आहे. त्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती सुरू आहे. मात्र, तरीही सार्वजनिक हिताचे हे नियम न पाळणार्या मुंबईकरांची संख्या वाढत आहे.

1 कोटी 64 लाखांचा दंड़ वसूल

विनामास्क फिरणार्यांविरोधात कारवाई अधिक वेगवान करण्यात आली असून 1 ते 21 ऑक्टोबर 2020 दरम्यान 82 हजार 497 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 1 कोटी 64 लाख 96 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार विनामास्क फिरणाऱयांविरोधीतल दंडात्मक कारवाई वेगवान करण्यात आली आहे.

मुंबईत 1,463 नवे कोरोना रुग्ण, 1,289 कोरोनामुक्त

मुंबईत आज दिवसभरात 1,463 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत एपूण 1,289 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 2 लाख 16 हजार 558 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 49 जणांचा मृत्यू झाला.

49 जणांचा मृत्यू

मुंबईत 49 जणांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या आता 9 हजार 918 झाली आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 19 हजार 491 इतकी आहे. आतापर्यंत 14 लाख 6 हजार 524 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 47 हजार 334 वर पोहोचली आहे.

– 9 एप्रिल ते 21 ऑक्टोबर 2020 दरम्यान मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱया 1 लाख 752 जणांकडून 2 कोटी 30 लाख 29 हजार 400 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला.

– या पैकी 1 ते 21 ऑक्टोबर 2020 या 21 दिवसांत एपूण 82 हजार 497 जणांकडून 1 कोटी 64 लाख 96 हजार 900 इतका दंड वसूल करण्यात आला. दंडापोटी मागील 21 दिवसांत वसूल केलेली रक्कम ही आतापर्यंतच्या एपूण रकमेच्या सुमारे 72 टक्के इतकी आहे. z मुंबईकरांनी घराबाहेर पडताना आवर्जून मास्क घालूनच बाहेर पडावे, ‘मास्क’चा वापर करण्यासोबतच हातांची स्वच्छता राखण्यासाठी हात वारंवार धुणे, सार्वजनिकरित्या वावरताना सुरक्षित अंतराचे पालन करणे, ही त्रिसूत्री सर्वांनी पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या