खड्डा दाखवा, 500 रुपये मिळवा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

पालिका मुंबईत 1 नोव्हेंबरपासून ‘रस्त्यावर खड्डा दाखवा, 500 रुपये मिळवा’ असा अभिनव उपक्रम सुरू करीत आहे. यामध्ये पालिकेच्या ऍपवर तक्रार नोंदवल्यानंतर 24 तासांत खड्डा बुजवला गेला नाही तर तक्रारदाराला 500 रुपये मिळणार आहेत. मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे.

मुंबईतील रस्ते दर्जेदार बनवण्यासाठी पालिका कोटय़वधी रुपये खर्च करते, मात्र अनेक वेळा नागरिकांकडून आपापल्या विभागात खड्डे असल्याच्या तक्रारी केल्या जातात. परिणामी ‘MCGM X 24’ या वेबसाइटसह खड्डय़ांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी जाहीर केलेल्या विभागवार व्हॉटस्ऍप नंबरवर अनेक तक्रारी दाखल होत असतात. या तक्रारी आल्यानंतर पालिका तातडीने हे खड्डे बुजवण्याचे काम करीत असते. मात्र तरीही अनेक ठिकाणी खड्डे बुजलेले नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवत आहे.

अशा असणार अटी-शर्ती

  • मुंबईकरांनी दाखकलेला खड्डा कमीत कमी एक फूट लांब आणि तीन इंच खोल असावा.
  • तक्रारीनंतर 24 तासांत खड्डा भरला गेला तर पैसे मिळणार नाहीत.
  • या योजनेसाठी My BMC pothole fix It या ऍपकर तक्रार नोंदवावी लागेल.
  • दाखवलेला खड्डा हा पालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यावरचाच असावा.