ढिल दे… इस पतंग को ढिल दे… पण नायलॉनचा मांजा नको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मकरसंक्रांतीचा सण तोंडावर आल्याने सर्वांना वेध लागलेत ते पतंग उडविण्याचे. बाजारातदेखील पतंग आणि वेगवेगळय़ा रंगाच्या मांजाच्या फिरक्या दिसू लागल्या आहेत. पण पतंग उडविण्यासाठी नायलॉनच्या मांजाचा वापर करण्यावर पोलिसांनी बंदी आणली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नायलॉनचा मांजा वापरू नका, असे पोलिसांकडून सांगण्यात आले असून जो कोणी नायलॉनचा मांजा वापरताना अथवा विकताना सापडेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.

पर्यावरण व नागरिकांसाठी नायलॉनचा मांजा घातक असल्याने तो वापरू नका, असे आवाहन नागरिकांना मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. 10 जानेवारी ते 8 फेब्रुवारीदरम्यान शहरात नायलॉनचा मांजा वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत जो कोणी नायलॉनचा मांजा वापरताना, विकताना सापडेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.