मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेतील कॉपी प्रकरण, बटण कॅमेऱ्याने पेपरफुटी; पर्यवेक्षकांनी उत्तरे सांगितल्याचा संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

7 मे रोजी 250 परीक्षा केंद्रांवर पार पडलेल्या मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठीच्या लेखी परीक्षेत हायटेक कॉपी झाल्याचे उघडकीस आले आहे. या कॉपी प्रकरणाचे अनेक पुरावे आतापर्यंत पोलिसांसमोर सादर करण्यात आले. विविध पोलीस स्थानकांत गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. मात्र या गंभीर प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याआधीच 17 मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. कॉपी करणारे अनेक परीक्षार्थी या परीक्षेत पात्र ठरल्याचा आरोप तक्रारदार परीक्षार्थ्यांनी केला असून पोलीस भरती प्रक्रिया सदोष होण्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.

मुंबई पोलीस दलात रिक्त 7 हजार 78 जागांसाठी 7 मे रोजी लेखी परीक्षा पार पडली. एकूण 250 पेंद्रांवरून 78 हजार 522 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. उमेदवारांनी बटन पॅमेरा आणि मायक्रो ब्लूटूथचा वापर करून कॉपी केली. काही परीक्षा पेंद्रावर पर्यवेक्षकांनीच परीक्षार्थ्यांना उत्तरे लिहिण्यात मदत केली तर काही ठिकाणी परीक्षार्थ्यांनी सामूहिक चर्चा करून परीक्षा दिली आहे. या लेखी परीक्षेत हायटेक पद्धतीचा वापर करून कॉपी केली असल्याचे प्रकरण सर्वात आधी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उघडकीस आणले. त्यानंतर याप्रकरणी 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. दाखल गुन्हय़ाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक 2 जून रोजी वैजापूर येथे गेले असता त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. हे हल्लेखोरच पेपरफुटीत सामील असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

कॉपी प्रकारामुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱया उमेदवारांवर अन्याय झाला आहे. याचे उदाहरण म्हणजे ईडब्ल्यूएस प्रवर्गाचा कटऑफ 119 होता तरीदेखील 116 गुण असणाऱया एका उमेदवारांची निवड करण्यात आल्याचा आरोप काही तक्रारदार परीक्षार्थ्यांनी केला आहे. याविरोधात परीक्षार्थ्यांच्या एका गटाने 24 मे रोजी आझाद मैदानात आंदोलनदेखील केले, पण हे आंदोलनही पोलिसांनी दडपल्याची आंदोलनकर्त्यांची तक्रार आहे. याप्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचे पुन्हा काटेकोरपणे आयोजन करण्यात यावे, अशी मागणीही तक्रारदार परीक्षार्थ्यांनी केली आहे.

काय आहेत आरोप

– परीक्षा केंद्रावर प्रवेश देताना काही उमेदवारांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली. काहींची घेतली नाही. n पर्यवेक्षकांनी काही परीक्षार्थ्यांना मोबाईलवरून उत्तरे शोधून दिली.
– परीक्षागृहात परीक्षार्थी सामूहिक कॉपी करीत होते. पर्यवेक्षकांचे लक्ष नव्हते.
– पर्यवेक्षकांनी काही उमेदवारांना उत्तरपत्रिकेवर नाव व नंबर लिहायला सांगितले. n शारीरिक चाचणीत अपात्र असलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेत पात्र ठरवले.

परीक्षेत पास करण्यासाठी दहा लाखांचा भाव?

उमेदवारांनी बटण कॅमेऱयाच्या सहाय्याने प्रश्नपत्रिकांचे पह्टो काढून ते ई-मेलद्वारे बाहेर पाठवले आणि बाहेर असलेल्या शिक्षकांनी त्यांना उत्तरे मायक्रो ब्लूटूथद्वारे सांगितली आहेत. याप्रकरणी पुरावे सापडले आहेत. अशा पद्धतीने शेकडो उमेदवारांनी ही परीक्षा दिल्याचा संशय आहे. एका उमेदवाराकडून 10 लाख रुपये घेण्यात आल्याचा आरोपही होत आहे.