ई-सिगारेटचा लाखो रुपयांचा साठा जप्त

ई-सिगारेट आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. हे ठाऊक असतानाही केवळ पैसा कमाविण्याच्या हेतूने ई-सिगारेटची कारवाई करणाऱया एकावर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी कारवाई केली. त्या विव्रेत्याकडून पाच लाख रुपये किमतीचा ई-सिगारेटचा साठा हस्तगत करण्यात आला. दक्षिण मुंबईतल्या मनीष मार्पेटसमोरील परिसरात एकजण ई-सिगारेटची विक्री करीत असल्याची खबर एमआरए मार्ग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स.पो.नि. संध्या निकम, उपनिरीक्षक आयरे तसेच शेलवले, मंडले आणि पाटील यांनी छापेमारी केली.