चार केबल ऑपरेटरचा जबाब नोंदवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीआरपी प्रकरणात आज क्राईम ब्रँचने सांगली, नाशिक, कोल्हापूर येथील चार केबल ऑपरेटरचा जबाब नोंदवला आहे. त्याचा मंगळवारी पुन्हा जबाब नोंदवला जाणार आहे.

मुंबई क्राईम ब्रँचने टीआरपी घोटाळा उघड करून आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. या तपासादरम्यान डय़ुअल एलसीएनचा प्रकार समोर आला होता. त्याची दखल घेत क्राईम ब्रँचने 6 केबल ऑपरेटरला चौकशीसाठी समन्स केले होते. त्यानुसार आज सांगली, नाशिक, कोल्हापूर येथील केबल नेटवर्पच्या चार जणांचा जबाब नोंदवला आहे.