मुंबई, पुणे सायबर गुन्हेगारांच्या रडारवर; क्विक हीलचा अहवाल

256

मुंबई, पुण्यासह नवी दिल्ली, बंगळुरू,कोलकाता या शहरांवर सायबर गुन्हेगारांची नजर असून महाराष्ट्र आणि दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना सर्वात जास्त टार्गेट करण्यात आल्याचे क्विक हिल टेक्नॉलॉजीजने नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘क्विक हिल ऍन्युअल थ्रेट रिपोर्ट 2020’अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे.

गेल्या वर्षभरातील क्विक हिल सिक्युरिटी लॅब्सने सायबर धोक्याच्या संदर्भात जमवलेल्या माहितीच्या विश्लेषणाद्वारे हा अहवाल तयार केला आहे. यात हिंदुस्थानी ग्राहक हे सायबर गुन्हेगारांचे सर्वात मोठे टार्गेट असल्याची चिंताजनक बाब दिसून आली आहे. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात तब्बल 38 दशलक्ष धोके ओळखले गेले असून यातील 25 दशलक्ष केवळ मुंबई, पुण्यातील आहेत. महाराष्ट्राखालोखाल दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि गुजरात ही राज्येदेखील सायबर धोक्याच्या कक्षेत असल्याचे सिद्ध झाले आहे.

n या अहवालात आढळून आलेली अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे 2019 मध्ये सायबर गुह्यांच्या कक्षा रुंदावल्या आहेत. सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक किचकट पद्धतींनी गुन्हे करू लागले आहेत. त्यामुळे सायबर गुन्हे ओळखले किंवा पकडले जाणे तितकेसे सोपे उरलेले नाही.

n स्मार्टफोन्स सर्वाधिक असुरक्षित आणि सायबर गुह्यांना पटकन बळी पडू शकतील अशा डिजिटल डिव्हायसेसपैकी एक बनले आहेत. स्पायवेअर आणि मालवेअर वापरण्यासाठी व्हॉटस्ऍपसारख्या लोकप्रिय ऍप्सवर हल्ला करून संवेदनशील माहिती चोरण्याचे प्रयत्न हॅकर्सनी 2019 साली केले.

आपली प्रतिक्रिया द्या