
मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी रात्री दरड कोसळली होती. ही दरड पाच तासानंतर काढण्यास प्रशासनाला यश आले. मात्र, भविष्यात दरडी कोसळू नयेत, म्हणून सैल झालेल्या दरडी हटवण्यासाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक सोमवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत बंद ठेवण्यात आली होती. ती सायंकाळपर्यंत बंद होती. प्रशासनाकडून रस्त्यावर आलेला मुरुम आणि राडारोडा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते.
राज्यात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असताना रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुणे – मुंबई एक्सप्रेस वेवर मुंबईकडे जाणाऱया मार्गावर मोठी दरड कोसळली. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली.

























































