मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 1 नोव्हेंबरपासून नवे वाहतूक नियम; कारसाठी ताशी 100 तर बससाठी 80 किलोमीटर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावरील वाहतुकीसाठी 1 नोव्हेंबरपासून नवीन नियम लागू होत आहेत. त्यानुसार वाहनांच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली आहे. कारसाठी ताशी 100 किलोमीटर तर बससाठी ताशी 80 किलोमीटरचा वेग निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मालवाहू वाहनांना या मार्गावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. करण्यात आली आहे. बोगद्यांमध्ये एखादा अपघात घडल्यास वाहतूक विस्कळीत होण्यासोबतच बचावकार्य आणि आपत्कालीन सेवांसमोरही आव्हाने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने पिकअप व्हॅन, टाटा एससारखी हलकी मालवाहू वाहने तसेच इतर सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना या मार्गावर प्रवेश करता येणार नाही. ज्वलनशील, स्फोटक आणि अन्य धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या मार्गावर बंदी घालण्यात आली आहे. मालवाहू वाहनांना या नव्या नियमांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या मूळ जुन्या मार्गिकेवरून प्रवास करावा लागणार आहे.