
दक्षिण पूर्व घाटात कर्जत आणि मंकी हिल (लोणावळा) परिसरात यंदाच्या अतिवृष्टीत झालेले मुंबई ते पुणे रेल्वेमार्गाचे नुकसान पाहून मध्य रेल्वेने पुन्हा एकदा दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. हे पायाभूत सुविधा उभारण्याचे काम तब्बल महिनाभर 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर असे चालणार असल्याने मुंबई ते पुणे मार्गावरील प्रगती एक्स्प्रेससह अनेक गाडय़ा रद्द तर इतर गाडय़ा अन्यत्र वळविण्यात आल्याने पुण्याला जाणाऱया रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.
रद्द करण्यात आलेल्या ट्रेन पुढीलप्रमाणे
51027 मुंबई-पंढरपूर पॅसेंजर (30 नोव्हेंबरपर्यंत), 51028 पंढरपूर-मुंबई पॅसेंजर (30 नोव्हेंबरपर्यंत), 12126 पुणे- मुंबई प्रगती एक्स्प्रेस (30 नोव्हेंबर), 12125 मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस (30 नोव्हेंबर), 51029 मुंबई-विजापूर पॅसेंजर (27 नोव्हेंबरपर्यंत), 51030 विजापूर-मुंबई पॅसेंजर (28 नोव्हेंबरपर्यंत), 07617 नांदेड-पनवेल साप्ताहिक स्पेशल (30 नोव्हेंबरपर्यंत), 07618 पनवेल-नांदेड साप्ताहिक स्पेशल (24 नोव्हेंबरपर्यंत), 51317 पनवेल-पुणे पॅसेंजर (30 नोव्हेंबरपर्यंत), 51318 पुणे-पनवेल पॅसेंजर (30 नोव्हेंबरपर्यंत).
दौंड-मनमाडमार्गे वळविण्यात आलेल्या ट्रेन
11025 भुसावळ-पुणे एक्स्प्रेस (1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर)
11026 पुणे-भुसावळ एक्स्प्रेस (1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर)
पुण्यानंतर रद्द होणाऱया आणि धावणाऱया
11029 मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस
11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस
17317 हुबळी-टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
17318 टिळक टर्मिनस-हुबळी एक्स्प्रेस
12702 हैदराबाद-मुंबई हुसेनसागर एक्स्प्रेस
12701 मुंबई-हैदराबाद हुसेनसागर एक्स्प्रेस
18519 विशाखापट्टणम-टिळक टर्मिनस
17614 नांदेड-पनवेल एक्स्प्रेस






















































