
मुंबई रेल्वे पोलिसांचा हेल्पलाइन नंबर 1512 सध्या तांत्रिक अडचणींमुळे खोळंबला आहे. केबल फॉल्टमुळे हा नंबर कार्यान्वित होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे मदत हवी असल्यास किंवा तक्रार नोंदवायची असल्यास रेल्वे पोलिसांच्या समाजमाध्यमाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले
आहे.
तांत्रिक कारणास्तव रेल्वे पोलिसांचा 1512 हा हेल्पलाइन क्रमांक बंद पडला आहे. परिणामी प्रवाशांना या नंबरवर मदत मागण्यास किंवा तक्रार करणे अवघड झाले आहे. हा नंबर केबल फॉल्टमुळे बंद पडला असून ते दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कृपया 139 हेल्पलाइन नंबर आणि व्हॉट्सअॅप नंबर 9594899991 वर संपर्क साधा, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे. 6 जानेवारीपासून 1512 हा हेल्पलाइन नंबर बंद आहे. रेल्वे पोलीस मुख्यालय परिसरात एक मोठे बांधकाम सुरू असल्यामुळे केबल लाईन्स प्रभावित झाल्या आहेत. हेल्पलाइन नंबर 24 तासांपेक्षा जास्त काळ बंद आहे.































































