
>> चंद्रकांत पालकर, पुणे
पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून मुठा नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 10,611 क्युसेक पाणी सोडले जात होते, ते आता सकाळी 10 वाजल्यापासून वाढवून 14,547 क्युसेक करण्यात आले आहे.
धरणाच्या पाणीपातळीनुसार आणि पर्जन्यमानानुसार हा विसर्ग आणखी वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो, असे जलसंपदा विभागाने कळवले आहे. त्यामुळे मुठा नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ही माहिती मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट, पुणे येथील उपविभागीय अभियंता, मोहन शां. भदाणे यांनी दिली आहे.