साकीनाक्यातील भीषण आगीची झळ विमानांना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साकीनाक्यातील आशापुरा कंपाउंडमधील इंडस्ट्रीज एरियाला संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत 30 ते 35 गाळे आणि गोदामे जळून भस्मसात झाले. इंडस्ट्रीज एरिया व दाटीवाटीची वस्ती यामुळे आग पसरली.आगीची झळ बाजूच्या झोपडपट्टीलाही बसली. धुराचे लोट परिसरात पसरल्याने येथील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

विमानसेवा खोळंबली

रासायनिक आगीमुळे काळा धूर मुंबई विमानतळापर्यंत गेला. त्यामुळे नाईलाजाने काही काळ विमानसेवा बंद ठेवावी लागली.विमाने 20 ते 25 मिनिटे खोळंबली. मात्र, धूर कमी झाल्यानंतर विमानसेवा पूर्ववत सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.