मुंबईहून सावंतवाडीला जाणाऱ्या जादा एसटी बसला अपघात, एक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गोवा महामार्गांवर आरवली नजिक खेरशेत कासे फाटा येथे मुंबईहून सावंतवाडी येथे एम एच १४ एम एच ६४५० बस ला जाणाऱ्या एसटी बस ला अपघात झाला..

अपघातात एसटी चे ब्रेक न लागल्याने पुढच्या सोळा टायर ट्रक ला धडक बसली. धडक एवढी भीषण होती की एसटी चा पुढचा भाग पूर्णपणे चकाचूर झाला.यामध्ये मारुती वॅगन आरला देखील मागून धडक बसली.या अपघातात एस टी तुन प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला दुखापत झाली असून,अन्य प्रवाशांना मुकामार लागला आहे. अपघातग्रस्त एसटी मुळे एकेरी वाहतूक पुढे सरकत असल्याने गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांची धिम्या गतीने वाहतूक सुरु होती.