
सामना प्रतिनिधी। मुंबई
शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी महालक्ष्मी रेसकोर्समधील वाहनतळ येथे मंगळवार, दि. 9 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.
महायुतीच्या या सभेमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांचेही भाषण होणार आहे. याप्रसंगी शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, उपनेते यशवंत जाधव, राजकुमार बाफना, रवींद्र मिर्लेकर, मीना कांबळी, आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, मनीषा कायंदे, माजी खासदार मोहन रावले, भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित, महामंत्री सुनील राणे, प्रवक्ते अतुल शहा, कोषाध्यक्ष शायना एन. सी. यांच्यासह दोन्ही पक्षांचे आजी-माजी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
























































