शनिवारी अंधेरीत ‘मुंबई श्री 2022’, शिवसेना-युवासेना आयोजक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची साडेसाती संपत असतानाच आता शरीरसौष्ठव क्षेत्रही आपले कार्यक्रम हिरिरीने राबवू लागले आहे. शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने येत्या शनिवार, 19 मार्चला सायंकाळी 6 वाजता ‘मुंबई श्री 2022’  जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना विधानसभा समन्वयक आणि आयबीबीएफएफचे उपाध्यक्ष व डीबीबीएफएएमचे अध्यक्ष मनोहर पांचाळ हे या स्पर्धेचे प्रमुख निमंत्रक आहेत. या शरीरसौष्ठव स्पर्धेत मुबईतील नामवंत शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार सौष्ठवाचे प्रदर्शन क्रीडाप्रेमींना घडवणार आहेत.

साईबाबा मंदिर ट्रस्ट, साईवाडी, ना. सी. फडके रोड, अंधेरी (पूर्व ) येथे आयोजित या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेला शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर, राज्याचे परिवहनमंत्री ऍड. अनिल परब, आमदार रमेश लटके, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, एएफबीएफ आणि आयबीबीएफएफचे सचिव संजय मोरे, माजी महापौर नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना संघटक कमलेश राय आणि शिवसेना विधानसभा संघटक सुभाष सावंत हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.