शीव उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम; 50 दिवसांत पूर्ण करणार

231

शीव येथील उड्डाणपुलाच्या बेअरिंग बदलण्यासाठी 107 जॅक्सचा उपयोग करण्यात येत असून हे काम 50 दिवसांत पूर्ण करण्याची योजना असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे. शीव येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या रखडलेल्या कामाबाबत आमदार आशीष शेलार यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर या उड्डाणपुलांच्या बेअरिंग बदलण्याचे काम या महिन्यात सुरू झाले असून 50 दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले.

आपली प्रतिक्रिया द्या