
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यजमान मुंबईसह कोल्हापूर, लातूरच्या संघानी अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली. पुण्याच्या मुलींच्या दोन्ही संघाने चमकदार कामगिरीसह दिवस गाजवला.
पुणे संघाच्या मुलींच्या दोन्ही संघाने विजयश्री प्राप्त केली. १८ वर्षांखालील मुलांच्या गटातील अटीतटीच्या लढतीत पुणे संघाने नाशिकचा २५-२०, २५-२१ गुणांनी पराभव करून गटात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. २१ वर्षांखालील मुलांच्या गटात मुंबईने नाशिकला २५-१०, २५-१२ गुणांनी नमवले. या गटातील दुसऱ्या साखळी लढतीत लातूरने कोल्हापूरवर २५-१५, २५-१० गुणांनी मात करीत विजयाचा झेंडा रोवला. १८ वर्षांखालील मुलींच्या गटातही लातूरने नाशिकचा २५-६, २५-११ गुणांनी धुव्वा उडवित मैदान गाजवले. २१ वर्षांखालील गटात पुणे संघाने लातूरवर २५-११, २५-१६ गुणांनी सहज मात केली. १८ वर्षांखालील गटात गटात पुणे संघाने संभाजीनगरवर २५-८, २५-१० गुणांनी एकतर्फी विजय मिळवला.






















































