मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी 373 कोटींच्या वार्षिक आराखडय़ास मान्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक योजना 2020-21 करिता एकूण 373.35 कोटी रुपयांच्या आराखडय़ास आज राज्याचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. डीपीसीमधून उपनगर जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिह्याच्या विकासाला गती देण्यात येईल, असे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

वांद्रे येथील चेतना महाविद्यालयाच्या सभागृहात आज ही बैठक झाली. बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, वस्त्राsद्योगमंत्री अस्लम शेख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह जिह्यातील खासदार, आमदार, नगरसेवक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.