
सामना ऑनलाईन। मुंबई
पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार व अभिनेता सन्नी देओल आघाडीवर असून त्यांचा विजय जवळ जवळ निश्चित समजला जात आहे. यामुळे अत्यानंद झालेल्या सन्नीने आपण आज खूपच आनंदात असून मोदी विजयाकडे वाटचाल करत असल्याने आपल्याला आनंद झाल्याचे म्हटले आहे. तसेच येथील लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यामुळे मी विजयी होणार असा मला विश्वास होता.असेही सन्नीने म्हटले. तसेच गुरदासपूरला चांगला मतदार संघ बनवणार असा दावाही यावेळी सन्नीने केला.
गुरदासपूर हा माजी केंद्रीय मंत्री विनोद खन्ना यांचा मतदार संघ होता. पण त्यांच्या निधनानंतर भाजपने सन्नीला याच मतदार संघासाठी उमेदवारी दिली. सन्नीचा सामना काँग्रेसचे सुनील जाखड आणि आपचे पीटर मासिह यांच्याबरोबर आहे. दरम्यान, सन्नीच्या यशस्वी घौडदौडीस त्याच्या चाहत्यांनी भरघोस शभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी मजेदार मीम्स मधून सन्नीचे कौतुक केले आहे.
Live pictures of actor turned politician #SunnyDeol 😛 pic.twitter.com/o2DwTmFoev
— Rohit Khilnani (@rohitkhilnani) May 23, 2019
Paaji leading with a 54% vote share. #SunnyDeol #Gurdaspur pic.twitter.com/YcFY07p1X7
— Iravati Damle (@IravatiD) May 23, 2019




























































