हिंदुस्थानातील क्रिकेट मोसमाला आजपासून सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे ठप्प झालेले हिंदुस्थानातील क्रीडाक्षेत्र हळूवारपणे पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करीत आहे. या मोसमातील पहिल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 हे या स्पर्धेचे नाव. या स्पर्धेत इशांत शर्मा, सुरेश रैना, शिखर धवन, सूर्यकुमार यादव या स्टार खेळाडूंसह शांतापुमारन श्रीशांत याचाही सहभाग असणार आहे. तसेच आयपीएलचा लिलाव फेब्रुवारीत होणार असून त्याआधी युवा खेळाडूंना आपली चमक दाखवण्यासाठी भक्कम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या वर्षअखेर हिंदुस्थानात टी-20 स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे.

सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेची गटवारी

  • एलिट गट, ए (बंगळुरू) – जम्मू-कश्मीर, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश, रेल्वे, त्रिपुरा.
  • एलिट गट, बी (कोलकाता) – ओडिशा, बंगाल, झारखंड, तामीळनाडू, आसाम, हैदराबाद.
  • एलिट गट, सी (बडोदे) – गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, बडोदे, उत्तराखंड.
  • एलिट गट, डी (इंदोर) – सर्व्हिसेस, सौराष्ट्र, विदर्भ, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा.
  • एलिट गट, ई (मुंबई) – हरयाणा, मुंबई, आंध्र प्रदेश, दिल्ली, केरळ, पुद्दुचेरी.
  • प्लेट गट (चेन्नई) – चंदिगड, मेघालय, बिहार, नागालॅण्ड, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश.