हॉलतिकीट यंदा महिनाभर आधीच, मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षेसाठी दोन लाख विद्यार्थी

 

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा लवकरच सुरू होणार असून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या महिनाभर आधीच हॉलतिकीट देण्यात आले आहे.

विद्यापीठस्तरावरील 431 परीक्षांसाठी सुमारे 2 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यातील पदवी व पदव्युत्तर नवीन दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची हॉलतिकिटे प्रथमच विद्यापीठाच्या डिजिटल युनिव्हर्सिटी पोर्टलवर विद्यार्थी-लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

हॉलतिकीट आधीच उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा पेंद्र, विषय, स्वतःची प्रोफाइल तपासून घ्यावी व काही बदल असल्यास महाविद्यालयांना त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

तसेच विद्यापीठाने महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण भरण्यासाठीची सुविधाही दोन महिने आधीच उपलब्ध करून दिली आहे.