आयडॉलमध्ये एकाच वेळी घेता येणार दोन पदव्या

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (आयडॉल) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस 11 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एकाच वेळी दोन पदव्या घेता येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये बीए (इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, ग्रामीण विकास, मराठी, हिंदी आणि इंग्रजी) या विषयांचा समावेश आहे. बीकॉम (कॉमर्स, अकाऊंटन्सी आणि बिझनेस मॅनेजमेंट), बीकॉम (अकाऊंट अॅण्ड फायनान्स), बीएस्सी (माहिती–तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचा समावेश असून या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केले जात आहेत. ऑनलाईन प्रवेश https://mucdoeadm.samarth.edu.in/ या ठिकाणी नोंदवता येणार आहेत.