
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळ सुरूच आहे. सोमवारी विधी शाखेच्या परीक्षेवेळी उत्तरपत्रिकेवर लावण्यात येणारे बारकोड परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना एक तासाहून अधिक उशिरा दिल्यामुळे परीक्षेची वेळ संपल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या हातात त्यांची उत्तरपत्रिका होत्या. याप्रकरणी उद्या युवासेना सिनेट सदस्य कुलगुरू डॉ. प्रा. रवींद्र कुलकर्णी यांची भेट घेणार असून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप देणाऱया परीक्षा केंद्र अथवा विद्यापीठ प्रशासन अधिकारी, कर्मचाऱयांवर सक्त कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.
विधी शाखेच्या पाचव्या सत्राची भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023(The juvenile justice Act 2012) या विषयाची परीक्षा सोमवारी सकाळी 10.30 ते 1.00 पर्यंत घेण्यात आली, परंतु सिद्धार्थ विधी महाविद्यालय, आनंद भवन, फोर्ट या परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिकेवर लावण्यात येणारे बारकोड विद्यार्थ्यांना तब्बल एक तासाहून अधिक उशिरा दिल्यामुळे परीक्षेची वेळ संपल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या हातात त्यांची उत्तरपत्रिका होती. याबाबत काही विद्यार्थ्यांनी युवासेनेकडे तक्रार केल्या. त्यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी संपर्क केला असता माहिती घेऊन संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. तरीही उद्या, मंगळवारी युवासेना सिनेट सदस्य कुलगुरू डॉ. प्रा. रवींद्र कुलकर्णी यांची भेट घेणार असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. इतर परीक्षा केंद्रांवरदेखील परीक्षा सुरळीत पार पडली का, याची चौकशी युवासेना करीत आहे.
रिझव्ही कॉलेजमध्येही गोंधळ
रिझक्ही किधी महाकिद्यालयात देखील साकळागोंधळ उडाला होता. परिक्षेवेळी या सेंटरमधील एका कर्गात सिटिंग क्यकस्थाच करण्यात आली नक्हती. बेंचेसकर सीट नंबरच टाकण्यात न आल्याने किद्यार्थी कुठेही बसले होते.

























































