वोडाफोन-आयडीया फाऊंडेशन स्कॉलरशिप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वोडाफोन-आयडिया फाऊंडेशनने ‘लर्निंग विथ वोडाफोन-आयडिया स्कॉलरशीप’ कार्यक्रमांतर्गत 2021-22वर्षासाठी शिक्षण आणि विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. शिक्षकांसाठी 1 लाख रुपये तर विद्यार्थ्यांसाठी 20 हजार रुपयांची रोख शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. मेरीटनुसार या शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत. नामवंत शिक्षक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या ज्युरीमार्फत ही निवड प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येते. शिष्यवृत्ती विजेते त्यांना मिळणाऱ्या निधीचा उपयोग आयटी उपकरणे, शालेय साहित्य विकत घेण्यासाठी तसेच फी भरण्यासाठी करू शकतात असे वोडाफोन-आयडियाचे मुख्याधिकारी पी. बालाजी यांनी सांगितले.