आवाजावरून कोरोना चाचणीला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या विरोधातील लढाई अधिक तीव्र करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आता आवाजावरून कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु केली आहे.

या यंत्रणेद्वारा व्यक्तीच्या किंवा संशयीत रुग्णाच्या आवाजावरुन त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को जंबो सुविधा केंद्रात व्हाॅईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला. मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, शहर जिह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर यांनी याचा ऑनलाइन प्रारंभ केला.

कल्पकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुंबईमधील कोरोनाविरूद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी आणि शहरातील कोविड रुग्णांकरीता त्वरित निदान आणि केळेत उपचारातून कोरोनावर मात करण्यासाठी मदत होईल असे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.