पाणी साचण्यापासून मुंबईची होणार सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे अतिवृष्टी आणि समुद्राला भरती असताना अनेक भागात पाणी साचते. मात्र, आता मुंबईची पाणी साचण्यापासून सुटका होणार आहे. सखल भागांत पालिका भूमिगत टाक्या बांधणार असून अतिवृष्टीचे पाणी या टाक्यांत साठवले जाईल. त्यामुळे रस्त्यावर कुठेही पाणी साचणार नाही. त्यामुळे पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यासाठी तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी बोलणी सुरू आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

प्रशासनाने या संदर्भात निविदा मागवल्या. मागवलेल्या निविदांना जपान, दक्षिण कोरिया आणि नेरदलॅंडमधील तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. मुंबईत सखल भागांमध्ये जपानमधील टोकियाच्या धर्तीवर भूमिगत टाक्या बांधण्यात येणार आहेत. याकरिता 31 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.