
सामना प्रतिनिधी। मुंबई
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वेगवेगळे आडाखे बांधले जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत ट्विट केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सविस्तर चर्चा केली, असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

























































