‘बीडीडी’ पुनर्विकासातील विक्री घरे चाळ रहिवाशांना 50 टक्के राखीव ठेवा!

886

वरळी येथील तब्बल 95 वर्षे जुन्या ‘बीडीडी’ चाळींतील रहिवाशांचे मुंबईच्या विकासात मोठे योगदान आहे. शिवाय हे रहिवासी पालिकेला राज्य शासनाच्या माध्यमातून नियमितपणे विविध प्रकारचे कर देत असतात. त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून होणाऱया ‘बीडीडी’ पुनर्विकासात निर्माण होणाऱ्या विक्री घरांमध्ये या चाळीतील रहिवाशांना 50 टक्के आरक्षण द्या अशी मागणी नामनिर्देशित नगरसेवक अरविंद भोसले यांनी महापौर, पालिका आयुक्तांकडे केली आहे. वरळीच्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास लवकरच करण्यात येणार आहे. या पुनर्विकासानंतर उर्वरित जागेमध्ये विक्रीसाठी उच्च उत्पन्न, मध्यम उत्पन्न व अल्प उत्पन्न गटांसाठी घरे बांधण्यात येणार आहेत. ही घरे शासन रेडिरेकनर (शासकीय दरपत्रक) प्रमाणे विक्री होत असताना त्यामध्ये बीडीडी चाळीतील रहिवाशांना ही घरे विकत घेण्यासाठी किमान 50 टक्के आरक्षण असावे अशी मागणी अरविंद भोसले यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना पत्रही दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या