
देशाची आर्थिक राजधानी अशी मायानगरी मुंबईची ओळख. इथले सण-उत्सव, खाद्य संस्कृती, दिमाखात उभ्या असलेल्या ब्रिटिशकालीन इमारती देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालतात. मुंबईचे हेच वैभव खेडच्या ओंकार घटे या तरुणाने मिनिएचर अर्थात लहान आकारातील थ्रीडी प्रतिकृतींच्या माध्यमातून साकारले आहे. लॉकडाऊनचा रिकामा वेळ सत्कारणी लाकत त्याने आपल्या कलाकृतींमधून मुंबईला सलाम केला आहे.
ओंकारला लहानपणापासूनच कलेची आकड. शाळेत असताना त्याने रद्दी पेपर, पुठ्ठय़ांपासून एसटी बस, रेल्के इंजिन तयार केले. तेक्हापासून त्याचा पेपर क्राफ्टमध्ये इंटरेस्ट वाढला. आपल्या कलेच्या प्रकासाविषयी तो सांगतो, ‘‘बारावीनंतर कलेच्या आवडीपोटी मी जे.जे.मध्ये प्रवेश घेतला. तिथे डिस्प्ले डिझाईन आणि स्टेज क्राफ्टचे धडे गिरकले. घरची परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणासोबतच प्रिलान्स काम केले. काही जाहिराती, केब सिरीजसाठी सेटच्या लहान आकारातील प्रतिकृती तयार केल्या. त्यातून मिळणाऱया पैशांतून कॉलेजची फी आणि राहण्याचा खर्च निघायचा. भविष्यात कलेच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करण्याचे स्कप्न आहे.’’
गेटवे ऑफ इंडिया, जे.जे. स्कूल ऑफ आर्टस्चे प्रवेशद्वार, मुंबईचा गणेशोत्सव आणि इथल्या खाद्य संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या वडापावची लहान आकारातील प्रतिकृती ओंकारने आपल्या घरात साकारली आहे. एका कलाकृतीसाठी त्याला आठ ते दहा दिवस लागले. त्यासाठी त्याने आईस्क्रीम स्टीक, एम सील, सनबोर्ड आणि टाकाऊ वस्तूंचा कापर केला. भविष्यात आपल्या कलाकृतींमधून जुन्या मुंबईचे ‘थ्रीडी’ दर्शन घडवण्याचा आणि त्याचे प्रदर्शन भरवण्याचा ओंकारचा मानस आहे.
अशी सुचली कल्पना
कलाकृतींबाबत ओंकार म्हणाला, ‘‘लॉकडाऊनमध्ये रिकाम्या वेळेत करियरच्या दृष्टीने विचार करून मी माझ्या कामाचा पोर्टफोलिओ तयार करायचे ठरवले. जेणेकरून माझी कला मला सर्कांसमोर सादर करता येईल. विषयाची निवड करताना माझ्या डोळ्यापुढे सर्कात आधी ‘मुंबई’ आली. उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना असलेल्या फोर्टमधील ब्रिटिशकालीन इमारती, पर्यटकांना आकर्षित करणारे गेटवे ऑफ इंडिया, इथले सण-उत्सव आणि खाद्य संस्कृतीने माझ्यातील कलाकाराला आकर्षित केले. यानिमित्ताने कलेतून मुंबईला सलाम करण्याची मला संधी मिळाली.’’

































































