इक्षु शिंदे ‘ग्लोबल फ्युचर स्कॉलर आणि डिप्लोमॅट’

मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची बारावीची विद्यार्थिनी इक्षु शिंदे हिचा अमेरिकेतील ‘द गॅरिबे इन्स्टिटय़ूट फॉर सॉफ्ट पॉवर अॅण्ड पब्लिक डिप्लोमसी’ संस्थेकडून ‘ग्लोबल फ्युचर स्कॉलर डिप्लोमॅट’ म्हणून गौरव केला आहे. इक्षु हिने शाळेतील उत्तम शैक्षणिक कामगिरीसोबत सामाजिक सहभागातही वेगळी छाप निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीदरम्यान मतदार जागृती उपक्रम राबवताना त्यांनी कार्यशाळा आणि रॅलींचे आयोजन केले. या मोहिमेद्वारे 8,000 हून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचत जागरूकता निर्माण करण्यात तिचा सहभाग होता.