‘आयडॉल’च्या तीन विद्यार्थ्यांनी परदेशातून दिली परीक्षा, नियोजनाचे झाले कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन घेतली. विद्यार्थी जिथे आहेत तिथूनच त्यांना परीक्षा देता यावी आणि ते सुरक्षित रहावेत यादृष्टीने ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला. लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या तीन विद्यार्थ्यांनीही दूर व मुक्त अध्ययन पेंद्राच्या (आयडॉल) तृतीय वर्ष बीएची परीक्षा अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीमधून दिली.

आयडॉलची तृतीय वर्ष बीए आणि बी. का@मची परीक्षा 26 ऑक्टोबरपासून सुरू झाली. त्यातील बीएची परीक्षा आज संपली. अपर्णा काकीर्डे या विद्यार्थिनीने अमेरिकेतून बीएची परीक्षा दिली. अर्थशास्त्र हा विषय घेऊन ती बीए करत आहे. ‘विनाअडथळा ही परीक्षा देता आली. काही प्रश्न अवघड असले तरी एपंदरीत प्रश्नपत्रिका चांगली होती.’ असे सांगतानाच कोरोना संकट दूर झाल्यानंतरही अशीच ऑनलाईन परीक्षा सुरू रहावी अशी अपेक्षा तिने एका प्राध्यापकाला पाठवलेल्या संदेशात व्यक्त केली.

अमिता सुभाष नंदी ही विद्यार्थिनी कोरोनामुळे फ्रान्समध्ये अडकली आहे. तिने बीएची अंतिम परीक्षा फ्रान्समधून दिली. सुरेंद्र सोळंकी हा विद्यार्थी जर्मनीमध्ये नोकरी करत आहे. त्याने तिथे राहून बीएची परीक्षा दिली. दोघांनीही विद्यापीठाच्या परीक्षा नियोजनाचे काwतुक केले. आयडॉलमधून शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे नोकरी करून शिकत असतात. विद्यापीठाच्या उत्तम नियोजनामुळे त्यांना कोणताही व्यत्यय न येता अंतिम वर्षाची परीक्षा देता आली.